Sunday, September 6, 2009

सातारचे सरदार

जावळीला चंद्रराव मोरे आले, फलटणला राव नाईक निंबाळकर आले. मलवडीला झुंझारराव घाडगे आले. म्हसवडला माने आले.

Saturday, September 5, 2009

पातशाही जमाना

सुमारे साडेसहाशे वर्षांपूर्वी...
मुह्म्मद शाह बहामनीच्या राज्यात व्यापारी मार्गावरील लुटारुंचा बंदोबस्त केला गेला. दख्खन शांती आणिभरभराटीच्य़ा वातावरणात भविष्याकडे आशावादी दॄष्टीने पहात होता. याच काळात सातारचा किल्ला बांधला गेला.
हुक्के बयान .... त्याचं नाव. आधीच्या बांधकामात सुधारणा केली गेली.



पुढं काळाच्या मनात काय होतं?
१३९६ ते १४०७.............
या बारा वर्षांत पावसानं तोंड फिरवलं. रानं वैराण झाली. धूळ आकाशा भिडली. वस्त्या निर्मनुष्य होत गेल्या. १०,००० बैलांच्या पाठीवरून गुजरातेतून धान्य आणवलं.
मंगळवेढ्य़ाच्या दामाजी पंतांनी बादशहाच्या परवानगी वाचून भुकेल्यांसाठी सरकारी गोदामं लुटवली. हजारोंचे प्राण वाचवले. बादशहाची इतराजी झाली. विठ्ठलानं बीदरला जाऊन रक्कम भरली, ती याच वेळी.


गावं ओसाड बनली. गुरं-ढोरं पटापट मरु लागली. रयतेनं बंड पुकारलं. दौलताबादेहून मलिक उत्तुजार खटावदेशी आला. त्यानं बंड शमवलं. बादशाही फौजा वाई पर्यंत आल्या. ही १४२६ ची गोष्ट. मलिक उत्तुजारला शिर्के आणि विशाळगडच्या शंकररायनं गनिमीकाव्यानं खिंडीत पकडून फौजेसह बुडवलं.

पहिला गनिमीकावा.


दुर्गादेवीच्या दुष्काळानं माणसं नेली. १४७४ मध्ये पाउस आला. नांगरायला गुरं नव्हती, नांगर धरायला माणसं नव्हती. 
१४८१ मध्ये युसुफ आदीलखानाने विजापूरला आदीलशाही स्थापली, सातारा आदीलशाहीला जोडले गेले.
 सातारा आदीलशाही परगण्यात तालुक्यात हरवून गेलं. अमील शेतसारा गोळा करु लागले. मोकासदार अमीलदारंवर हुकमत करु लागले. सुभा किंवा सुभेदार सातारची कायदा अन सुव्यवस्था संभाळू लागले.
किल्ल्यांवर किल्लेदार आले, जहागीरदार देशमुख वतनांवर वतनदार आले.

Golkonda


Posted by Picasa

अरुणोदयापूर्वी

साडेचौदाशे वर्षांपूर्वी चालुक्यांच्या अधिपत्याखाली, हजार वर्षांपूर्वी राष्ट्रकूटांच्या छत्राखाली, आठशे वर्षांपूर्वी शिलाहारांच्या राज्यात सातारा नांदत होता.
सातशे वर्षांपूर्वी हसन गंगू बहामनीनं कुलबर्ग्य़ाच्या राजधानीतून १३४७ मध्ये बहामनी राज्य उभं केलं. १३५७ मध्ये या राज्याच्या चार "तर्फ" केल्या. प्रत्येकावर तरफदार किंवा राज्यपाल नेमण्यात आले.
सातारा कुलबर्ग्याच्या तरफेत जमा झाला.

Friday, September 4, 2009

पहाट...

इसवी सनापूर्वी २०० वर्षे.......,..
आजपासून सुमारे २२०० वर्षापूर्वी,
मध्यभारतातील जबलपूर जवळच्या भारहूत स्तूपाला कराडच्या भक्तगणाने दिलेल्या देणगीचा उल्लेख आहे. सातारच्या दक्षिणेचा सुपिक प्रदेश, जिथं बौद्ध गुंफा मंदीरे आहेत-- एवढ्या दूरवर जाणा-या भक्तांचा होता. शेकडोमैलावरील मंदीराला देणगी देऊ शकणा-या दानी श्रीमंतांचा होता.
देणगीचा लेख व्हावा इतक्या योग्यतेचे श्रेष्ठी इथं होते. मग प्रदेश किती सुजलाम सुफलाम असेल? व्यापारी इतकेश्रीमंत तर सामान्यजन किती सुखी असतील?
साता-यात पैशाची देवघेव मोठ्याप्रमाणावर चालत होती. महाड, दाभोळ ,चिपळूण या बंदरातून चालणा-या व्यापाराच्या मार्गावरचे काफीले, उत्तमोत्तम माल लादलेल्या बैलांचे तांडे -- वरंधा , कुंभार्ली घाटातून, सातारच्या डोंगर द-यातून जात.
अनेक पाणपोया, थांबे, खानावळी अन व्यापारीमार्गावरच्या सुरक्षारक्षकांच्या वर्दळीनं गजबजलेला सातारा.


जबरेश्वर, फलटण

राजा शिव छत्रपति !

Posted by Picasa
आज पासून आपण रोज भेटणार आहोत.
राजधानी सातारामध्ये.
इतिहासाच्या पानापानातून......