सुमारे साडेसहाशे वर्षांपूर्वी...
मुह्म्मद शाह बहामनीच्या राज्यात व्यापारी मार्गावरील लुटारुंचा बंदोबस्त केला गेला. दख्खन शांती आणिभरभराटीच्य़ा वातावरणात भविष्याकडे आशावादी दॄष्टीने पहात होता. याच काळात सातारचा किल्ला बांधला गेला.
हुक्के बयान .... त्याचं नाव. आधीच्या बांधकामात सुधारणा केली गेली.
पुढं काळाच्या मनात काय होतं?
१३९६ ते १४०७.............
या बारा वर्षांत पावसानं तोंड फिरवलं. रानं वैराण झाली. धूळ आकाशा भिडली. वस्त्या निर्मनुष्य होत गेल्या. १०,००० बैलांच्या पाठीवरून गुजरातेतून धान्य आणवलं.
मंगळवेढ्य़ाच्या दामाजी पंतांनी बादशहाच्या परवानगी वाचून भुकेल्यांसाठी सरकारी गोदामं लुटवली. हजारोंचे प्राण वाचवले. बादशहाची इतराजी झाली. विठ्ठलानं बीदरला जाऊन रक्कम भरली, ती याच वेळी.
गावं ओसाड बनली. गुरं-ढोरं पटापट मरु लागली. रयतेनं बंड पुकारलं. दौलताबादेहून मलिक उत्तुजार खटावदेशी आला. त्यानं बंड शमवलं. बादशाही फौजा वाई पर्यंत आल्या. ही १४२६ ची गोष्ट. मलिक उत्तुजारला शिर्के आणि विशाळगडच्या शंकररायनं गनिमीकाव्यानं खिंडीत पकडून फौजेसह बुडवलं.
पहिला गनिमीकावा.
दुर्गादेवीच्या दुष्काळानं माणसं नेली. १४७४ मध्ये पाउस आला. नांगरायला गुरं नव्हती, नांगर धरायला माणसं नव्हती.
१४८१ मध्ये युसुफ आदीलखानाने विजापूरला आदीलशाही स्थापली, सातारा आदीलशाहीला जोडले गेले.
सातारा आदीलशाही परगण्यात तालुक्यात हरवून गेलं. अमील शेतसारा गोळा करु लागले. मोकासदार अमीलदारंवर हुकमत करु लागले. सुभा किंवा सुभेदार सातारची कायदा अन सुव्यवस्था संभाळू लागले.
किल्ल्यांवर किल्लेदार आले, जहागीरदार देशमुख वतनांवर वतनदार आले.
येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!
13 years ago
No comments:
Post a Comment